“वाहतूक नियंत्रण शाखा गडचिरोली तर्फे वाहतूक नियम मार्गदर्शन कार्यशाळा”
1 min read“जिल्ह्यातील रस्ते अपघात नियंत्रित करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वाहतुक नियम बाबत विशेष मार्गदर्शन”
गडचिरोली; ८ जुलै: गडचिरोली जिल्ह्यातील वाढती वाहन संख्या व वाहतूक नियम बाबत अज्ञानाचा परिणाम दूर्घटना व जिवीत हानी होत असून हे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिकक्षक निलोत्पल यांनी विशेष अभियान हाती घेतले असून वाहतूक नियंत्रण शाखेच्या माध्यमाने शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियम बाबत मार्गदर्शन करत आहेत.
याच आभियाना अंतर्गत आज श्री शिवाजी हायस्कूल तथा कला कनिष्ठ महाविद्यालय , पोरला, कै सितारामजी पाटील मुनघाटे हायस्कूल कनिष्ठ महाविद्या महाविद्यालय, काटली, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा , काटली, जिल्हा परिषद शाळा , साखरा येथे जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा गडचिरोली तर्फे वाहतूक नियम मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी युवक युवतींना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.
नूकतेच वसा पोरला गावा लगत ट्रक खाली येवून एका चिमूकल्याचा जिव गेला होता. या घटनेची गांभीर्यता लक्षात घेत पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी पुढाकार घेत मूख्यमार्ग लगत शाळा चिन्हांकित करून विशेष वाहतूक नियम व मार्ग भ्रमण बाबत जाणीव जागृती अभीयान सूरू केलं आहे.
आज झालेल्या मार्गदर्शन कार्यशाळे नंतर सर्व शाळेतील शिक्षकांनी एक विनंती केलेली आहे ज्या ज्या गावात मूख्य रस्त्या लगत शाळा आहे त्या सर्व मूख्य रस्त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची आवश्यकता आहे तसेच समोर शाळा आहे वाहने सावकाश / हळु चालवा असा बोर्ड लावण्याची विनंती केली आहे.