*भाडे तत्वावर वाहन पुरवठा करण्याकरीता अर्ज आमंत्रित*
1 min readगडचिरोली,दि.04(जिमाका): जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या दक्षता पथकास गृहचौकशी व मुळ अभिलेख पडताळणीकरीता (बोलेरो, टाटा सुमो) तसेच, समितीचे अध्यक्ष व इतर कार्यालयीन कामाकरीता (स्विफ्ट डिझायर, टाटा झेस्ट, होंडा अमेझ (सेमी सिडन)या दर्जाची वाहन भाडे तत्वावर पुरवठा करण्याबाबत इच्छुक वाहन पुरवठा धारकांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
तरी, इच्छूक वाहन पुरवठा धारकांनी निविदेकरीता व अधिक माहीती करीता दिनांक 05 जुलै 2024 ते दिनांक 14 जुलै 2024 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक, एलआयसी रोड, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा 07132-296181 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन ना. धारगावे यांनी कळविले आहे.