December 23, 2024

गोंडवाना विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

1 min read

‘जिल्ह्यातील उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन’

गडचिरोली,  09 जुलै : गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या तसेच विविध महामंडळे उपस्थित असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी स्वत:चा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रासह गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहून पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!