“येरंडी येथे तीन दिवसीय लघु व्यवसायाबाबत मार्गदर्शन प्रशिक्षण संपन्न”
1 min readकुरखेडा; ९ जुलै : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वतीने सामाजिक उद्यमशीलता विकास कार्यक्रमाअंतर्गत ३८ दिव्यांग व्यक्तींना ४ ते ६ जुलै या कालावधीत राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्र येरंडी येथे ३ दिवसीय निवासी लघु व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार यांनी संस्थेविषयक माहिती देत दिव्यांग व्यक्तींना घेऊन संस्था करत असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मोहित चौधरी यांनी दिव्यांग आणि व्यवसायाकरिता उपलब्ध संसाधने, समाजात दिव्यांग व्यक्तीप्रति व्यवसायाला घेऊन मते, उपलब्ध संसाधने, समस्या, आव्हाने, मर्यादा, शासकीय पातळीवर असलेल्या योजना, सद्यःस्थितीतील चालत असलेले लघु व्यवसाय, लघु व्यवसाय करीत असताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. नरेश कांबळे यांनी लघु व्यवसाय म्हणजे काय? महत्त्व व आवश्यकता, पारंपरिक लघु व्यवसाय, याबाबत सांगितले.