April 25, 2025

“मासे पकडणे जिवावर; बंधाऱ्यात बूडून यूवकाचा मृत्यू”

गडचिरोली न्यूज नेटवर्क , एटापल्ली , जूलै १० :

तालुक्यातील मरपल्ली येथे मासे पकडण्यासाठी गेलेला युवक बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना ८ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली.

मरपल्ली येथील डुम्मी नाल्यावरील बंधाऱ्याजवळ ८ रोजी रात्री दहा वाजता तीन युवक गेले होते. यावेळी मासे पकडताना बंधाऱ्यात अडकलेले लाकूड काढताना अंकुश उर्फ अक्षय पांडू कुडयेटी (वय २३) हा खाली कोसळला. यावेळी सिमेंटच्या खांबाचा मार पोटाला लागल्याने तो पाण्यात बुडाला. सोबत गेलेले विलास हिचामी (वय ४२) व अभिजित सिडाम (वय २२) हे दोघे आरडाओरड करत गावात परतले.

तहसीलदार हेमंत गागुर्डे व ठाणेदार नीलकंठ कुकडे यांनी १० रोजी शोधमोहीम राबवली. अखेर दुपारी अडीच वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. अंकुश कुडयेटी याच्या शोधकार्यावेळी बंधारा परिसरात मोठी गर्दी झाली होती.

घटनास्थळापासून जवळच एका झुडपाला त्याचा मृतदेह अडकलेला आढळून आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.

दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे परिसर सुन्न झाला होता. उशिरापर्यंत पोलिसांत नोंद नव्हती.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!