December 22, 2024

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम , वनविभागाने घेतला पुढाकार : आरमोरीत आईच्या नावाने लावली रोपटी

1 min read

गडचिरोली न्यूज नेटवर्क , जूलै १०:

आरमोरी : स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत येथील वडसा रोडलगतच्या पटांगणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम रविवारी सकाळी घेण्यात आला.

यावेळी विविध जातींच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली. त्या झाडाचे योग्य जतन करण्याचा निर्धार कण्यात आला.

आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने, परिविक्षाधीन  वन अधिकारी निखिल पाटील, अमोद कोयाडवार, क्षेत्रसहायक मुखरु किनेकर, राजेंद्र कुंभारे, वनरक्षक अजय उरकुडे, पी. आर. पाटील, आनंद साखरे, नलिनी भरें, वर्षा डोंगरे, वनमजूर व विविध संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी मेश्राम यांनी उपस्थितांना झाडांविषयी व भारत सरकारच्या एक पेड माँ के नाम अभियानाविषयी, ग्लोबल वार्मिंगविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन वनरक्षक आनंद साखरे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!