December 22, 2024

“देसाईगंज शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका द्या, अन्यथा १८ जुलैला चक्काजाम आंदोलन डॉ. शिलू चिमुरकरांचा भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना अल्टिमेटम”

1 min read

गडचिरोली न्यूज नेटवर्क; जूलै १०;देसाईगंज:

देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेसाठी भुमिअभिलेख कार्यालयाच्या वतिने करण्यात आलेल्या मागणीनुसार येथील नगर परिषदेच्या वतिने जवळपास ८० टक्के रक्कम २०१८ मध्ये शासन जमा करण्यात आले.दरम्यान शहराचा सिटी सर्व्हे करण्यात न आल्याने येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भुमिअभिलेख कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलन केले असता सिटी सर्व्हे सुरु करण्यात आला.मात्र सिटी सर्व्हेची एकुणच संथ गती पाहु जाता येथील गरजु गोरगरीब नागरिकांना आखिव पत्रीके अभावी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता शहराचा यथाशिघ्र सिटी सर्व्हे करून आखिव पत्रिका देण्यात यावी,अन्यथा विरोधात १८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्ट येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा अल्टिमेटम काँग्रेस कार्यकर्त्या डॉ. शिलू  चिमुरकर यांनी येथील भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिला आहे.
शहरातील गरजु व पात्र लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देता यावे करीता शासकीय स्तरावरुन प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना,रमाई घरकुल योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गरजुंना देता यावा करीता येथील नगर प्रशासनाने देसाईगंज शहराचे सिटी सर्व्हे करून अतिक्रमण धारकांवर मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात नगर परिषदेच्या मान्यतेने देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयीन पत्राच्या मागणीनुसार भुमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपयाची मागणी करण्यात आली असता देसाईगंज नगर परिषद कार्यालयाकडून ४ जानेवारी २०१८ रोजी २ कोटी ५० लाख,६ जुलै २०१८ रोजी ३ लाख तसेच १९ डिसेंबर २०१८ ला २५ लाख असे एकूण २ कोटी ७८ लाख रुपये देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयास अदा केले आहेत.
देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ९ एप्रिल २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात सुभारंभ करण्यात आला होता. अदा करण्यात आलेल्या रकमेची टक्केवारी एकुण मान्यताप्राप्त रकमेच्या ८० टक्के असुनही त्या प्रमाणात मात्र अद्यापही सिटी सर्व्हेचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरीकांना पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असतांना शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सिमा निश्चित करण्यात आल्या नसल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडलेली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेचे काम यथाशिघ्र पुर्ण करून येथील नागरीकांना आखिव पत्रिका देण्यात याव्यात,अन्यथा १८ जुलै २०२४ रोजी कुरखेडा टी-पाईन्ट येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा अल्टिमेटम काँग्रेस कार्यकर्त्या डॉ. शिलु चिमुरकर यांनी भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिला आहे.याबाबत भुमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे. निवेदन सादर करतांना पिंकू भाऊ बावणे युवा नेता वडसा,विजय पिल्लेवान, नरेश लिंगायत, भूमीत मोगरे, अमित सलामे, आकाश शिऊरकर, सुनील चिंचोलकर, भूमेश्वर निमजे, रजनी आत्राम, विमल मेश्राम,रीना शेंडे, मालता गेडाम आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!