“कुरखेडा तालुका दक्षता समितीत गेवर्धा ग्रामपंचायत सदस्य रोशन सय्यद नियुक्त “

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै ११: ताहिर शेख, गेवर्धा :
मा.जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे दि. 8 फेब्रुवारी 2024 चे पत्रानुसार दक्षता समिती, कुरखेडा या समिति मध्ये ग्राम पंचायत सदस्य श्री रोशन सय्यद यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
तालुका दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल निवडीचे श्रेय आमदार श्री.कृष्णाजी गजबे सा, यांना दिल तर भाजपा तालुका अध्यक्ष, मार्गदर्शक श्री.चांगदेवभाऊ फाये आणि अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.बबलूभाई हुसैनी यांचे विशेष आभार रोशन सय्यद यांनी मानले आहे.