“वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी घेवून शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयावर धडक”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क; जुलै १२ :(देसाईगंज) : तालुक्यातील शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत विजेच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. विजेचा सुरळीत पुरवठा न झाल्यास वीज समस्या गंभीर होण्याची बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.
देसाईगंज तालुक्यात धान रोवणीची कामे सुरू आहेत. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नसल्याने शेतीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याकरिता मोटार पंप लावणे गरजेचे आहे. तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे पाणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. शेतीला लागणारा वीजपुरवठा सुरळीत
करण्यात यावा. डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विद्युत मीटर देण्यात आले नाही. अशांना मीटर देण्यात यावे. तालुक्यातील किन्हाळा येथे असलेले व रोहित्र ६३ केव्ही ऐवजी १०० केव्ही करण्यात यावे. पिंपळगाव येथे एकाच डीपीवर संपूर्ण भार येत असून दुसरी अतिरिक्त डीपी लावण्यात यावी. शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात देसाईगंज वीजपुरवठा अधिकाऱ्यांशी रामदास मसराम व शेतकरी यांनी चर्चा करून समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी केली. याप्रसंगी परसराम टिकले,
कोरेगाव, रावणवाडी येथील पुरुषोत्तम भागडकर, शेतकरी महेंद्र खरकाटे, शुभम नागपूरकर, शेखर कुथे,सागर वाढई, विजय पिल्लेवान, जावेद शेख, अमोल मिसार, रोशन कोसरे, जितू चौधरी, रितेश गाडगे, धनराज गायकवाड, शैलेश बघमारे, धर्मेंद्र लाडे, गणेश गायकवाड, मारोती गायकवाड, पुरुषोत्तम मस्के, पुरुषोत्तम ठेंगरी, दयाराम गायकवाड, प्रभाकर खरकाटे तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.