December 23, 2024

“सती नदी वरील रप्टा तुटल्याने तालुका मुख्यालय बाजारपेठची अर्थव्यवस्था कोलमडली”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १७; (कुरखेडा );  कुरखेडा मुख्यालय येथील बाजार पेठ सध्या पूला अभावी बंद पडलेल्या रहदारीचा प्रभाव येथील व्यवसायावर स्पष्ट दिसू लागला आहे. जवळपास १०० च्या वर गावांचा थेट रहदारी मार्ग बंद पडल्याने पायी व साइकिलने मुख्यालय गाठणारे नागरिक येणे बंद पडल्याने येथील व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे व्यापारी वर्ग सोबत झालेल्या चर्चेतून समोर आले आहे.

ही परिस्थिती फक्त मुख्यालयातील व्यवसायावर नसून परिसरातील गावखेड्यातून फेरी द्वारे तालुका मुख्यालयात दूध वितरक, वाडी भाजीपाला विक्रेते, कबाडी वाले आदि लोकांना या पुलाच्या तुटण्यामुळे संकटाचा सामना करावा लागत आहे.

तालुका मुख्यालयात शनिवारी भरणारा आठवडी बाजारावर ही या पूल नसण्याचा फटका बसला आहे. नदी पलीकडून येणारे नागरिकांची गर्दी बंद झाल्याने येथील आठवडी बाजाराचा रेलचेल ही बंद पडल्यासारखी झाली आहे. नदी पलिकडे असलेल्या शेती पिकविणे ही शेतकऱ्यांना तारेवरची कसरत ठरणार आहे. १५ किलोमीटर फेरी मारून नदीपलीकडे जाणे शेतकऱ्यांनाही नपरवडणारे आहे.

येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करता येथील महामार्ग निर्मितीचे काम करणाऱ्या कंपनीला सती नदी वरील खचलेल्या रपट्याची दुरुस्ती करुन नदीला पाणी कमी असतांना दुचाकी , साइकिल व पायी प्रवास करणाऱ्यांना सुविधा करुन द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

About The Author

error: Content is protected !!