“कृषी महाविद्यालयात ५० टक्के पदे रिक्त; तातडीने उपाय करुन ही पदे भरावीत” ; “लेटस कनेक्ट टू चेंज गडचिरोली या सामाजिक संघटनेची मागणी”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क ; जुलै १७; (गडचिरोली) : येथील कृषी महाविद्यालयात ५० टक्के पदे रिक्त असून त्यामुळे शैक्षणिक कामकाज प्रभावित होत आहे. याबाबत तातडीने उपाय करुन ही पदे भरावीत, अशी मागणी लेटस कनेक्ट टू चेंज गडचिरोली या सामाजिक संघटनेने १६ जुलै रोजी येथे केली.
शहरातील चंद्रपूर रोडवरील अतिशय देखणी वास्तू आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी B.Sc. (Agri.) हा अभ्यासक्रम सुरू असून प्रवेश क्षमता ६० प्रती वर्ष एवढी आहे. यापैकी ८० टक्के प्रवेश आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. महाविद्यालयीन भौतिक सुविधांचा विचार करता येथे अतिरिक्त तुकडी मंजूर करून इतर बांधवांनाही प्रवेशाची संधी द्यावी, अशी मागणी केली. या महाविद्यालयाला कुंपण नसल्याने अनेक अडचणी आहेत. दीड वर्षांपूर्वी या परिसरात वाघाने प्रवेश केला होता. सदर महाविद्यालयासाठीची प्रात्यक्षिकांची जागा व्यवस्थित नाही. शिवाय भात हे प्रमुख पीक असतानाही संशोधन होत नाही. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्मिती करावी, अशी मागणीही करण्यात आली. विपुल वनसंपत्तीचा विचार करता त्यावर आधारित B.Sc. (Forestry) हा अभ्यासक्रम सुरू करावा, महाविद्यालयाचे रुपांतर कृषी विद्यापीठात करावे, अशी मागणी केली. यावेळी डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. धम्मदीप बोदेले, अॅड. उमेश मडावी, सीए आदित्य जाजू, इंजि. पंकज सोमनकर, सतीश चिचघरे, अनिल तिडके उपस्थित होते.