December 23, 2024

“स्टील निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन ; दोन उपमुख्यमंत्री, दोन मंत्री आज जिल्ह्यात”

1 min read

गडचिरोली  न्यूज नेटवर्क ; जुलै १७; (गडचिरोली) : नक्षलप्रभावित व अतिदुर्गम अहेरी तालुक्याच्या वडलापेठ येथे आज १७ जुलै रोजी सुरजागड इस्पात प्रा. लि. च्या वतीने स्टील निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री चव पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. विजयालक्ष्मी बिदरी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. विपीन शर्मा, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित राहणार आहेत.

आज १७ जुलैला सकाळी साडेअकरा वाजता भूमिपूजन समारंभ होणार आहे. सूरजागडनंतर कोनसरी व आता वडलापेठ येथे लोहखनिजावर आधारित प्रकल्प उभारत असताना येथील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.

“धर्मरावबाबांनी दिली जमीन दान”

• या उद्योगासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली २१० एकर जमीन दिली आहे. सुरजागडनंतर वडलापेठ येथे लोहखनिज कारखाना उभारत असल्याने अहेरी मतदारसंघासाठी ही मोठी उपलब्धी आहे.

• १८ जुलैला आलापल्ली येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे. यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.

“खासदारांना डावलल्याने काँग्रेसची टीका”

या कार्यक्रमास खासदार डॉ. नामदेव किरसान यांना डावलल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने धास्ती घेतली असून त्यामुळेच काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, असा टोला त्यांनी लगावला. याआधी आपत्ती निवारण समितीच्या बैठकीतही खासदारांना डावलेले होते, आता सुरजागड इस्पातच्या भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण न दिल्याने भाजपने खासदारांचा नव्हे तर इथल्या जनतेचा अवमान केल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली.

About The Author

error: Content is protected !!