“खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा”
1 min read*काँग्रेस नेत्या शिलु चिमुरकर व महाविकास आघाडिचा संयुक्त उपक्रम*
गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १७ ;(देसाईगंज) :
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांचा १४ जुलै २०२४ रोजी काँग्रेस नेत्या शिलु चिमुरकर मित्र परिवार तसेच देसाईगंज तालुका महाविकास आघाडिच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज शहराच्या हेटी वार्डातील पार्वती मतिमंद मूकबधिर विद्यालयातील मुलांची आरोग्य तपासणी करून,फळ वाटप करून केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून आस्थेने विचारपूस करून आरोग्य विषयक मार्गदर्शन करुन यथायोग्य उपचार घेण्यासंदर्भात प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,महादेव कुंमरे, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष इलियास खान,युवा नेता लिलाधर भर्रे,माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकु बावणे,जगदिश शेंद्रे, कैलास वानखेडे,योगेश नेवारे,भुमेश्वर शिंगाडे,विजय पिल्लेवान, तांबेश्वर ढोरे,महेंद्र खरकाटे,दुर्वास नाईक, गीताबाई नाकाडे,रजनी आत्राम,वैष्णवी आकरे, पुजाताई ढवळे, मालताताई पेंदाम तसेच महाविकास आघाडिचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.