“गुलामे अली स्टोर्स यांच्या तर्फे मोहरम निमित्य महाप्रसाद आणि शरबत चे वितरण”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १७;(देसाईगंज/वाडस) : मोहरम निमित्य देसाईगंज या ठिकाणी गुलामे अली स्टोर्स च्या संचालक तर्फे महाप्रसाद आणि शरबत चे वितरण करण्यात आले.
इस्लामिक कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याचे नाव मोहरम आहे. मुस्लिमांसाठी हा सर्वात पवित्र महिना आहे. या महिन्यापासून इस्लामचे नवीन वर्ष सुरू होते.मोहरम महिन्याच्या 10 व्या दिवसाला म्हणजेच 10 तारखेला रोज-ए-आशुरा म्हणतात. इस्लामिक कॅलेंडरमध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी हजरत इमाम हुसैन शहीद झाले होते. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद यांचे धाकटे नातू हजरत इमाम हुसैन यांनी करबलामध्ये आपल्या ७२ साथीदारांसह शहीद झाले होते. म्हणूनच हा महिना गमचा महिना म्हणून साजरा केला जातो.इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ शरबत आणि खिचडा बनविला जातो. आज देसाईगंज या ठिकाणी गुलामे अली स्टोर्स यांच्या तर्फे महाप्रसाद आणि शरबत चे वितरण करण्यात आले . या प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, गुलामे अली स्टोर्स चे संचालक आणि सुप्रसिद्ध सुफी कव्वाल हाजी मजीद शोला, वामानराव जी सावसाकडे, माजी नगर सेवक शहेजाद शेख, सोहेल शेख, इलियास खान, अकबर पटेल, वहीद शेख, मनोज ढोरे, सज्जाद शेख, इर्शाद खान, अमन लालानी, उझेर सय्यद आदी उपस्थित होते.