“एका जहाल माओवाद्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण”
1 min read“शासनाने जाहिर केले होते एकुण 02 लाख रूपयाचे बक्षिस.”
गडचिरोली, जुलै २४: नक्षल्यांच्या भामरागड दलमचा सदस्य असलेल्या लच्चू करिया ताडो(४५) या नक्षल्याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
लच्चू ताडो हा भामरागड तालुक्यातील भटपार येथील रहिवासी असून, २०१२-१३ पासून तो गावात राहून जनमिलिशिया म्हणून नक्षल्यांना राशन आणून देणे, नक्षल्यांची शस्त्रे लपवून ठेवणे, पोलिसांची माहिती नक्षल्यांना देणे अशाप्रकारची कामे करीत होता. मागच्या वर्षी तो भामरागड दलमचा सदस्य झाला. त्याच्यावर जाळपोळ आणि जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये इरपनार गावाजवळच्या रस्त्यावर नक्षल्यांनी १९ वाहनांची जाळपोळ केली होती, त्यात लच्चूचा प्रत्यक्ष सहभाग होता. शिवाय २०२३ मध्ये नेलगुंडा गावाजवळच्या जंगलात स्फोटके पुरुन ठेवण्यातही तो सहभागी होता.
आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६७० नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तसेच २०२२ ते २०२४ या कालावधीत २२ नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला, असे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती
लच्चु करीया ताडो
दलममधील कार्यकाळ :
- सन 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्यूटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.
- सन 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत.
कार्यकाळात केलेले गुन्हे
- जाळपोळ -01
सन 2022 मध्ये मौजा ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
इतर – 01
- सन 2023 मध्ये मौजा नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
- गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.
- दलममधील सोबतच्या सदस्यांना पोलीसांकडून अटक करण्यात आल्याने व घरातील सर्व सदस्य व नातेवाईकांनी आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे.
- दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात.
- जनतेच्या विकासासाठी तो पैसा कधीच वापरल्या जात नाही.
दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
- वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
- वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.
- गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.
शासनाने जाहिर केलेले बक्षिस.
- महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.
- आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.