April 26, 2025

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजना नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात ₹3,000 अनुदान दिले जाईल.

योजनेचा उद्देश

या आर्थिक मदतीचा उद्देश वृद्ध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मदत करणे आहे. हे पैसे त्यांना चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र किंवा इतर आवश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरता येतील.

अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सबमिट करा.

फॉर्ममध्ये भरण्याचे प्राथमिक तपशील

फॉर्ममध्ये तुम्हाला  पासपोर्ट साईज फोटो चिकटवावा लागेल,

पूर्ण नाव,  वय (किमान 65 वर्ष), व्यवसाय (असेल तर), गावाचे नाव,  तालुका, जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरायचे आहेत.

घोषणापत्र व पात्रता

तुम्ही मागील तीन वर्षांत कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही, याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे. फॉर्म मध्ये हे देखील जागा दिलेली आहे आणि भरणे अनिवार्य आहे.

फॉर्मचे भाग

फॉर्ममध्ये काही महत्वाचे भाग आहेत, जसे की:

लाभार्थ्याचे नाव

वय (किमान 65 वर्षे)

लिंग

जात आणि प्रवर्ग

मोबाईल क्रमांक

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न (कमाल ₹2,00,000)

कागदपत्रे

तुम्हाला उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड झेरॉक्स आणि बँक पासबुक झेरॉक्स हे कागदपत्रे जोडावी लागतील. फॉर्म भरण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा.

बँक तपशील

तुमच्या बँक खात्याचे नाव, शाखा, खाते क्रमांक, आणि IFSC कोड अचूक भरा. अनुदान थेट या खात्यात जमा होईल.

फॉर्म जमा करण्याची प्रक्रिया

फॉर्म भरून झाल्यानंतर, आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा. तपशील अचूक भरणे आवश्यक आहे, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

तुमची पात्रता आणि माहिती अचूक आहे याची खात्री करा. चुकीची माहिती दिल्यास फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.

योजनेचा अर्ज खालील लिंक मधून डाउनलोड करावा.

https://drive.google.com/file/d/1q0oWjwqCAxSS-WWAHsyrMbZREeOSlgOC/view

मुख्यमंत्री वयश्री योजना ही वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी एक महत्त्वाची योजना आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!