April 26, 2025

“तो एक हत्ती , गोंदिय जिल्ह्यातून नागणडोह मार्गे पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात”

“वन विभागाच्या चमूचे लक्ष : गोठणगाव परिसरातील पिकांचे केले नुकसान”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट ०२ : हत्तीच्या कळपातील एक पूर्ण वाढ झालेला नर हत्ती अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मंगळवारी दि. ३० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास या हत्तीने नागणडोह मार्गे पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाकडे कूच केल्याची माहिती आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील रोवणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतात रोवणीच्या कामात गुंतले आहे आहेत. मात्र, चार दिवसांपूर्वी हत्तीच्या कळपातून भरकटलेला एक हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला होता.

शेतकऱ्यांनी वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर विभागाने या हत्तीच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी वन विभागाचे एक पथक स्थापन केले होते. हे पथक दररोज हत्तीचे लोकेशन घेत होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा हत्ती अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह परिसरातून गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाच्या दिशेने गेल्याचे वन विभागाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

कळपातील पूर्ण वाढ झालेला नर हत्ती हा काही काळासाठी कळपापासून वेगळा होवून परत कळपात मिसळत असतो. त्यामुळे हा हत्ती गडचिरोली येथे असलेल्या आपल्या कळपाकडे मार्गक्रम करीत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!