December 22, 2024

“कत्तलीसाठी जाणाऱ्या २ २ जनावरांची सुटका; जनावरांसह एकुण १ २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , ऑगस्ट ०२: (कोरची): तालुक्यातून जनावरांची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच बेडगांव पोलिसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कत्तलीसाठी जाणाऱ्या २२ जनावरांची आज १ ऑगस्ट रोजी कसायांच्या तावडीतून सुटका केल्याची घटना बोरी टी पाईंट येथे घडली. या प्रकरणी १२ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच बेडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोउपनि. उदय पाटील यांनी अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या परवानगीने पोउपनि अमोल गुरूपवार यांच्या नेतृत्वात बेडगाव येथील बोरी टी पॉईंट येथे नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी चालु असताना बोरी कडुन येणारे दोन पिकअप वाहने थांबवुन त्याची झडती घेतली. एमएच ४९ एटी १३४५ क्रमांकाच्या बोलेरो पिक अपमध्ये ११ जनावरे आढळून आली. एमएच ३३-टी-२५४१ क्रमांकाच्या दुसऱ्याही बोलेरो पिक अप वाहनात ११ जनावरे आढळून आली. पोलीसांनी एकंदरीत १२ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपी अतिक बशिर शेख, (३६) रा. गोठणगाव, ता. कुरखेडा, हरीश मन्नु पटोडी ( ३०) रा. जांभुळखेडा, ता. कुरखेडा, हंसराज काशिराम मडावी (२३) रा. जांभुळखेडा, ता. कुरखेडा, गुरूदेव उमराव बारई (२४) रा. गोठणगाव, ता. कुरखेडा यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी पोउपनि उदय पाटील हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिंता, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोमके बेडगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि उदय पाटील व पोउपनि. अमोल गुरूपवार यांनी केली. कोरची तालुक्यातुन कत्तलीसाठी जनावरांची तस्करी केल्या जात असल्याची प्रकरणे यापुर्वीही उघडकीस ह आली होती हे विशेष.

About The Author

error: Content is protected !!