“गडचिरोली शहर पोलिस एक्शन मोड मधे, पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई करत पाऊणे दोन लाखांची दारू केली जप्त”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क , ऑगस्ट ०२ (गडचिरोली) : गडचिरोली शहर पोलिस एक्शन मोड मधे असून नवनियुक्त ठाणेदार आर. के. सिंगणजुळे यांच्या नेतृत्वात गडचिरोली ठाण्याच्या हद्दीतील दारूविक्री बंद करण्यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे.
१ ऑगस्ट रोजी दिवसभरामध्ये विविध पाच दारू विक्रेत्यांवर कारवाई करून दोन दुचाकींसह सुमारे १ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चनकाईनगर येथील अर्जुन शील यांच्या घरावर छापा टाकून करण्यात आली. एकूण १७ हजार ९०० रुपयांचा देशी-विदेशी मुद्देमाल जप्त केला. गोकुळनगर येथील रहिवासी वैशाली पिपरे यांच्या घरी केलेल्या कार्यवाहीत ११ हजार २०० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. तिसरी कारवाई चंद्रपूर मार्गावर करण्यात आली. वासुदेव मतलमी हा चंद्रपूरहून १४ हजार ५०० रुपयांची दारू घेऊन येताना दुचाकीसह पकडला. कनेरी येथील रजनी कोतपल्लीवारच्या घरातून साडेचार हजार रुपयांची दारू जप्त केली. पाचव्या कारवाईत विसापूर मार्गावर हरबचनसिंग दुधानी हा सात हजार रुपयांची दारू दुचाकीवरून करताना आढळला असता त्याला ताब्यात घेत कार्यवाही केली.