October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

पोलीस स्टेशन कुरखेडा च्या वतीने शांतता रॅलीचे आयोजन

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , ऑगस्ट ०२  : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन कुरखेडाच्या वतीने आज  रोज शुक्रवार सकाळी ९ वाजता माओवाद विरोधी शांतता रॅलीचे आयोजन कुरखेडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या शांतता रॅली ची सुरुवात श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथून सुरुवात करित मुख्य बाजारपेठ ते पंचायत समिती मार्गे शांतता रॅली काढत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे समारोप करण्यात आली.


यावेळी संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये, ठाणेदार महेंद्र वाघ, प्राचार्य नागेश्वर फाये, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, प्रा. प्रदीप पाटणकर, प्रा. विनोद नागपूरकर, प्रा. ज्ञानेश्वर देशमुख, प्रा. सत्यम फटिंग, नंदिनी कोटांगले, अपूर्वा बाबोळे व पोलीस अधिकारी व अमलदार मोठ्या संख्येत उपस्थित होते..
या शांतता रॅलीमध्ये श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!