December 23, 2024

“वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसुर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करा, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी”

1 min read

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क, ऑगस्ट ०२: वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसुर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (असो.) चे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे यांच्यासह शिष्टमंडळाने मा.खा. अशोक जी नेते यांच्याशी चर्चा करुन निवेदन सादर केले.

वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्याना रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदार द्वारे नाली खोदकाम केल्यामुळे काही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सदर कामाचे वनगुन्हा दाखल करण्यात आले होते.संपूर्ण महाराष्ट्रात एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो.देश स्वतंत्र होऊन सुद्धा गावाला जाण्याकरिता रस्ते नाही.सदर गावे हे मुलभूत सोयी-सुविधेपासून वंचित आहेत. रस्त्याच्या विकासकामाकरिता कर्मचाऱ्याचे निलंबन करणे हि कार्यवाही योग्य नाही. सदर कार्यवाही हि मानवाधिकार चे हनन आहे.जर विकासकामामध्ये कर्मचाऱ्याना निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्याचे मानसिक संतुलन खचीकरण करणे होय. या वन कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावा.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागडमध्ये मोठ्या प्रमाणात कामे चालू आहेत.तिथल्या कामात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परंतु 300 ते 400 मीटरच्या छोट्या रस्त्याच्या कामामध्ये कर्मचाऱ्याचे निलंबन करणे सदर बाब हि अन्यायकारक असून मानवाधीकार संघटना अश्या कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय सहन करणार नाही.याची दक्षता घेऊन विनंती करत कर्मचाऱ्याचे निलंबन तातडीने रद्द करण्यात यावे. व सुरजागड अंतर्गत होत असलेल्या संपूर्ण नियमबाह्य कामाची चौकशी करण्यात यावी.

वन कर्मचाऱ्याचे निलंबन रद्द न केल्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तर्फे CCF कार्यालासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनाची दखल घेत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोक जी नेते यांनी गडचिरोली वन वृत्तांत चे मुख्य वनसंरक्षक श्री.रमेशकुमार यांना तात्काळ दूरध्वनीवरून कर्मचाऱ्याचे निलंबन रद्द करण्या संबंधित दुरध्वनीद्वारे सुचना केल्या यावर मुख्य वनसंरक्षक अधिकारी यांनी सकारात्मक विचार व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात येईल असे आश्वासित केले.

यावेळी प्रामुख्याने मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे,राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास,मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष क्रिष्णाजी वाघाडे,मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भिमराव वनकर, पत्रकार सुरज हजारे,तसेच मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!