December 23, 2024

“पोलीस व पत्रकारांच्या प्रयत्नांनी अखेर राधा आजीला मिळाला आसरा ; आनंदवनात पोहिचताच कष्टदायी जीवन झाले सुखकर”

1 min read

सिरोचा, ऑगस्ट ०३ : माणसाचं जीवन म्हणजे देवांनी दिलेला एक अनमोल जीवन आहे. मात्र या छोट्याशा आयुष्यात लोकांसोबत कसे जीवन जगावं हे मात्र आपले मन ठरवत असत. सगळे असून सुद्धा वाईट परिस्थितीत कोणीच आपला साथ देणारा नसतो. अशीच परिस्थिती सिरोंचा येथील राधा आजीवर कोसळली. मात्र पोलीस व पत्रकारांनी माणुसकी दाखविल्याने अखेर राधा आजीला कष्टदायी जीवनातून मुक्ती मिळाली आहे.

सिरोंचा येथील इंदिरा गांधी चौकात असलेल्या शिव मंदिरा लगतच्या चौकात गेल्या काही महिन्यांपासून राधा नावाची एक आजी कधी बसलेली, कधी पडलेली, कधी बसत बसत सरकत असलेली अनेकांना दिसायची. डोळ्यांनी दिसणं बंद झालं आणि तिचं जीवन नरक झालं. मिळेल ते खायची. त्याला मातीही लागलेली असायची, अनेक महिन्यांपासून आंघोळ नाही . चिखल असला तर चिखलात पडून राहायची. त्यातच पावसाळा आला. धो धो पाऊस कोसळत असतानाही ती पाण्यात भिजत राहायची. रात्रभर रडत बसायची, कधीतरी तिला पोलीस शिपाई नईम शेख व असे ईतर कोणी उचलून बाजूला त्या कॉम्प्लेक्स च्या शेडमध्ये नेऊन ठेवायचे.

तिची व्यथा बघून पत्रकार महेश तिवारी यांनी तिची या दुःखातून सुटका करण्यासाठी अंध वृद्धांसाठी एखादा अनाथालय आहे का अशी विचारणा करणारी पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर टाकली
बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदनामध्ये अशी व्यवस्था आहे अशी माहिती अनिकेत आमटे यांनी पत्रकार महेश तिवारी यांना दिली. महेश तिवारी यांनी आनंदवन येथील व्यवस्था सांभाळणारे कौस्तुभ आमटे आणि पल्लवी आमटे यांच्याशी संपर्क साधून त्या आजीची संपूर्ण परिस्थिती सांगून तिला तिथं: आनंदवनात ठेवण्याची विनंती केली. कौस्तुभ आणि पल्लवी आमटे यांनी ती विनंती मान्य केली त्यानंतर पत्रकार महेश तिवारी यांनी सिरोंचाचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्याशी बोलून तिला आनंदवनात कसे पाठवता येईल यावर चर्चा केली. पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी तिला आनंदवनात पाठवण्याची जबाबदारी घेतली. अखेर सकाळी राधा आजी अनुभवत असलेल्या नरक यातनांमधून सुटका करणारा दिवस उजाडला. सिरोंचाचें उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी आजीला आनंदवनात पाठवायची संपूर्ण तयारी केली. सकाळी पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण त्या आजीला सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. तत्पूर्वी पोलीस निरीक्षकांनी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर किरण वाघमारे तसेच नगर पंचायत चे मुख्याधिकारी काडबाजीवार आणि नगरपंचायत चे घोङे याच्याशी चर्चा  करून संपूर्ण विषय सांगितला असता वृद्धाश्रम पर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी नगरपंचायत वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वाघमारे यांनी त्या ठिकाणी आजीच्या तब्येतची तपासणी केली . तिला त्या ठिकाणी स्वच्छ करून आंघोळ घालून नवे कपडे घालून देण्यात आले. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी काडबाजीवार यांनी अभियंता घोडे यांच्याकडून एक वृध्द महिलेच्या नातेवाईकांशी बोलून पत्रव्यवहार केला आणि वृद्धाश्रमात टाकण्यासाठी संमती घेतली. नंतर अँब्युलन्स उपलब्ध करून दिले आणि संबंधित संस्थेशी पत्रव्यवहार करून सबब महिलेला भरती करण्यास पत्र पाठविण्यात आले. राधा आजीला आनंदवनात पाठवण्यासाठी पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ता बबलूच्या अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर अॅम्बुलन्स मध्ये एक माणूस सोबत घेऊन अॅम्बुलन्स मधून तिला आनंदवनात पोहोचवण्यात आले.
आजीला नवजीवन देण्यासाठी सरसावले अनेकांचे हात
गेल्या वर्षभर राधा आजी जनावरा सारखं जीवन जगत होती.. पण तिच्या जीवनात हा दिवस जगण्याची नवी उमेद देणारा दिवस ठरला आहे. अनाथांच्या मदतीला नाथ धावून जातो असं म्हटलं जाते. आज राधा आजीच्या वेदनांना संपवत तिला नवजीवन देण्यासाठी पत्रकार महेश तिवारी, सिरोंचाचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी पुढाकार घेऊन तिला आनंदवनात हक्काचं घर मिळवून दिले. राधा आजीला आपल्या घरात स्थान दिल्याबद्दल आनंदवन व्यवस्थापनाचेही आमटे कुटुंबीयांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी व पोलीस शिपाई नईम शेख यांनीही आपआपल्या परीने सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!