गडचिरोलीत दारू तस्कर विरोधात धाडसत्र ; दोन दुचाकींसह १.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त , तीन आरोपी ताब्यात, एक फरार”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क , ऑगस्ट ०५ : शहर पोलिसांचे धाडसत्र सुरूच असून रविवारी चंद्रपूर मार्गावर विविध दोन कारवायांत दोन दुचाकींसह १ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात महारू वारूल मडावी, रा. चित्तेकन्हार, सोनू राजेश वाळके, भूषण शेषराव कोसनकर, दोन्ही रा. गोकुलनगर, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत, तर प्रतीक खोब्रागडे, रा. गोकुलनगर, असे फरार आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली शहरात दुचाकीने दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस ठाण्याच्या डी.बी. पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३३ एसी ६६९६ या क्रमांकाची ८५ हजार रुपये किमतीची दुचाकी व १४ हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत सोनू वाळके, भूषण कोसनकर यांना ताब्यात घेण्यात आले, तर प्रतीक बारसागडे हा फरार झाला. दोन्ही कारवायांत १ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाया पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकाचे धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, वृषाली चव्हाण यांनी केली. विशेष म्हणजे, गेल्या १० दिवसांपासून दररोज दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू असल्याने विक्रेते पुरते हैराण आहेत.