“राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेची वेंगनूर प्राथमिक उपकेंद्रला भेट; सुरगाव येथील शेतकऱ्यांना छत्री चे वाटप”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क : ऑगस्ट ५ : गडचिरोली जिल्यातील उपकेंद्र वेंगनूर या अतिसवेदनशील भागात जाऊ राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय जी खुणे. राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास. डा भारत खठी. सरपंच भास्कर बुरे. गुड्डु खुणे.प्राथमिक उपकेंद्रचे डाक्टर उपस्थित होते यावेळी प्रणय भाऊ खुणे यांनी या उपकेंद्रला एम्ब्युलन्स आरो वॉटर मशीन,वाल्कपाउंड शासनाणे उपलब्ध करून दयावे मागणी केली.तसेच गडचिरोली जिल्हा हा जगात सर्वात श्रीमंत जिल्हा असूनही अतिशय गरीब जिल्हा आहे. सुरजागड येथील करोडो रुपयाच्या कर ने पूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. सुर्जागड येथे आपण सुद्धा नौकरी करू शकतो पण आपल्याला शिक्षण घेणे महत्वाचे आहे. या सुरजगड क्षेत्रात रोड नाही. रस्ते नाही आपण जगापासून कोसो दूर आहो असे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे छत्री वाटत कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.राष्ट्रीय मानवाधिकार संगठन चे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी .मानवाधिकार संगठन नेहमी जनतेच्या हिताचे कार्य करीत असते. तसेच मागील अनेक वर्षा पासून विविध सामाजिक संगठन. राजकीय संगठना. पत्रकार. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनचे सत्कार. गोर गरीब जनतेला टॉर्च वाटप. छत्री वाटप. रुग्णालयात गरीब रुग्णाला औषध व आर्थिक मदत करत असते.