December 23, 2024

“त्या एका शब्दाने केला घात ; चिखली हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर”

1 min read

कुरखेडा ; ऑगस्ट १२:  कधी कोणता शब्द कोणाच्या जिव्हारी लागेल हे सांगत येत नाही. एका बोच-या शब्दा मुळे कुणाला आपला जीव गमवावा लागेल या पेक्षा दुसरे दुर्दैव नाही. चिखली येथील हत्याकांडात हेच आश्चर्यकारक सत्य समोर आले आहे.

कुरखेडा तालुक्यातील चिखली येथे ९ ऑगस्ट च्या पहाटे २८ वर्षीय जीतेशचा मृतदेह गावाबाहेर वडेगाव रस्त्यावर पडून होता. रक्त बंबाल या युवकाचा शव पाहून पोलिसांना सूचना करताच भल्या पहाटे पोलिसांनी ही गंभीरता लक्ष्यात घेता घटनास्थळ गाठत तपास चक्रे फिरवायला सुरवात केली. गावातील काही युवकांवर संशय असल्याने त्यांना ताब्यात घेत तपास सुरु केला. आरोपी जितू उर्फ विशाल पिसोरे (१९) वैभव सहारे (१९) व अमन पठान (२०) सर्व रा. चिखली याना अटक करण्यात आली न्यायालयात हजर केले असता यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासादरम्यान मोबाईल चोरीचा वाद समोर आला असला तरी या प्रकरणात एक मोठी व धकादायक बाब समोर आली आहे. मृतक जितेश याने आरोपी जितू ऊर्फ विशाल पिसोरे याला भांडण दरम्यान लोकांसमोर “बायल्या” या शब्दाने उच्चारण केला होता. आपला या मुळे खूप अपमान झाल, याला अद्दल घडवायचीच असा राग मनात धरून त्या रात्रो आपल्या दोन मित्रासोबत जितूने डाव साधला असल्याची बाब समोर आली आहे.

घटनेच्या रात्रो मृतक जितेश याचा गावातील एका परिचित कडे जेवण होता. आरोपींना ही बाब माहीत होताच त्यांनी तिथूनच त्याचा गेम करायचा ठरवलं. इकडे जितेश या सर्व बाबीपासून अनभिज्ञ होता. मटण पार्टी असल्याने दारू ही खूप ढोसली आणि जेवण आटपून तो आपल्या घरी जायला निघाला. घराबाहेर त्याचा डाव साधण्यासाठी उभे असलेल्या तिघांनी त्याला गावा बाहेर नेलं. दारूच्या नशेत असल्याने जितेश कडून काहीच प्रतिरोध झाल नाही. सोबत आणलेल्या लोखंडी सलाखीने जितेशच्या डोक्यावर व पाठीत वार करताच तो रस्त्यावर पडला तो शेवटचाच. तो रस्त्यावर पडला प्राणगत झाला तरी त्यावर आरोपी राग काढत राहिला अशी माहिती समोर येत आहे.

घटनेच्या वेळी आरोपी सुद्धा दारूच्या नशेत होता अशी माहिती आहे. घटना करून तिघेही आपल्या घरी निघून गेले. घटनेत वापरलेली लोखंडी सलाख रस्त्यातील शाळेच्या आवारात फेकली होती ती पोलिसांनी हस्तगत केली आहे. रस्त्यात जातानी भेटलेल्या काही लोकांना आपण जीतेशचा मुड्दा पाडला आपण कमजोर नाही. अशी बडबड आरोपी करत असल्याची ही माहिती आहे.  तो एक शब्द जिव्हारी लागल्याने जितेशला आपला जीव गमवावा लागला या बाबत लोक स्तब्ध आहेत.

About The Author

error: Content is protected !!