“अवजडवाहनांना शहरात प्रवेश निषिद्ध वेळ निश्चित करण्यात यावे या मागणी सह काँग्रेसचे विविध समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन”
1 min readगडचिरोली, ऑगस्ट १३ : गडचिरोली एटापल्ली तालुक्य्यातील सुरजागड व चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लोह प्रकल्पातून दळवळण करणाऱ्या वाहनांमुळे जीवितहानी थांबविण्यात यावी, तसेच मृतकांच्या परिवाराला अपेक्षित नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
अवजड वाहनाच्या शहरात प्रवेश करण्याच्या वेळा निश्चित व नियंत्रित करणे गरजेचे आहे. सकाळी १० ते १२ व सायंकाळी ४ ते ६ वाजतापर्यंत शालेय विद्यार्थी, कर्मचारी, मजूरवर्ग यांची गर्दी असते. त्या वेळामध्ये जडवाहनांना शहरात प्रवेश निषिद्ध करण्यात यावे, यासोबत आजपर्यंत झालेल्या अपघातामध्ये मृत व्यक्तींच्या परिवाराला भरीव नुकसान भरपाई प्रकल्प, प्रशासन व शासनाच्या वतीने तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
गडचिरोली शहरास आउटर रिंग रोड तयार करण्यात यावे, आरटीओचे चेक पोस्ट तयार करून धरम काटा लावण्यात यावे, ट्रक वाहतुकीकरिता विशिष्ट वेळेत जेव्हा लोकांचा आवागमन कमी असतो अशा वेळी करण्यात यावे, गावच्या प्रारंभी व अंतिम वेशिष गतिरोधक बसविण्यात यावे आदि मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे, प्रदेश प्रतिनिधी समशेरखान पठाण, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक रमेश चौधरी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सौरभ पा. म्हशाखेत्री, प्रदेश सहसचिव प्रतीक बारसिंगे, पुषपेंद्र साहू, चारुदत्त पोहाणे, प्रफुल आंबोरकर, धवल सूचक, अतुल राचमलवार, आनंदराव पारधी, जावेद खान, अभिजित धाईत, कल्पक मुप्पीडवार, दत्तात्रय खरवडे, सर्वेश पोपट, तेजस मडावी, समीर ताजने, निखिल खोब्रागडे आदी उपस्थित होते.