December 23, 2024

मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या युवकाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

1 min read

कुरखेडा, १३ ऑगस्ट :  तालुक्यातील काढोली येथील गावालगत वाहणाऱ्या सती नदीत मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ च्या दरम्यान घडली. मृत पावलेल्या युवकाचे नाव काढोली निवासी विशाल ताराचंद सहारे वय २१ वर्ष आहे.

प्राप्त माहितीनुसार काढोली येथील ५ युवक गावालगत वाहत असलेल्या सती नदीत अंघोळ करण्या करिता गेले होते. मित्रासोबत नदीत आंघोळी करिता पाण्यात उतरलेल्या विशालला पाण्याचा अंदाज नआल्याने तो खोलीतील पाण्यात उतरला. नदीला पाणी जास्त असल्याने तो बुडाल. त्याच्या सोबत असलेल्या युवकांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. परंतु वेळेवर कुठलीच मदत मिळाली नाही. गावातील युवक नदीच्या पाण्यात बुडाल ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोकांनी नदी पात्राकडे धाव घेत गावातील भोई समाजाच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेतला असता युवक बुडालेल्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर मिळून आला. पाण्यातून काढण्यात उशीर झाल्याने युवक मयत झाल्याने पोलिस विभागला सूचना करण्यात आली. प्रकरण आरमोरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करत शव उत्तरीय तपासणी करिता आरमोरी येथे पाठविण्यात आले आहे.

घटनेची माहिती कळताच कुरखेडा येथील तहसील कार्यालतील आपत्तीव्यवस्थापन चमूने तहसीलदार कुरखेडा यांच्या नेतृत्वात घटना स्थळकळे धाव घेत मदत कार्य केले. आरमोरी पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

घटनेत मृत युवकाच्या परिवारात दोन भाऊ व आई आहे. युवकाच्या वडिलांचा पूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तरुण वयात मुलाचं अवेळी निधन झाल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. घटनेत मृत्यू पावलेल्या युवकाच्या परिवारास तत्काळ शासनाकडून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

Ai 2 bhau

About The Author

error: Content is protected !!