December 23, 2024

“जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून तहसीलदार काम पाहणार”

1 min read

गडचिरोली, ऑगस्ट १४ :  जिल्ह्यातील  ९ नगरपंचायतीतील पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने तहसीलदारांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी संजय दैने यांनी हे आदेश काढले. आधीच जिल्ह्यातील तीन नगरपालिकांमध्ये सुमारे तीन वर्षांपासून प्रशासकराज आहे. गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज येथे नगरपालिका असून कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड येथे नगरपंचायत आहे. नगरपालिकेतील शेवटची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. पाच वर्षांचा कालावधी उलटून तीन वर्षे झाल्यानंतरही आरक्षणावरून निर्माण झालेल्या गुंत्यामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. तथापि, जिल्ह्यातील ९ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणूक २० जानेवारी २०२२ रोजी पार पडली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची अडीच वर्षांसाठी निवड झाली होती. ही प्रकिया काही ठिकाणी १४ फेब्रुवारी २०२२ तर काही ठिकाणी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली होती. या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १४ व १५ ऑगस्ट २०२४ रोजी रोजी पूर्ण होत आहे. नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदार हे आता नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

About The Author

error: Content is protected !!