आरोग्यावर खर्च कमी करायचा असेल तर आहारात रानभाज्याचा उपयोग करा; आमदार ,कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन
1 min readकुरखेडा, ऑगस्ट २५: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानवी आरोग्य सुदृढ राहण्याच्या दृष्टिकोनातून मानवांनी आरोग्यावर खर्च कमी करायचा असेल तर सर्वांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा उपयोग करावे असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले ते तालुका कृषी कार्यालय कुरखेडा यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर उद्घाटक म्हणून आमदार कृष्णा गजबे,अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी महेश परांजपे , प्रमुख अतिथी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते सर्वंग विकास अधिकारी धीरज पाटील,तालुका व्यवस्थापक उमेद सरोज मारेकरी, नगराध्यक्ष अनीता बोरकर, उपाध्यक्ष बबलू हूसैनी
अध्यक्ष शेतकरी तालुका समन्वय चांगदेव फाये, सामाजिक कार्यकर्ते गणपतराव सोनकूसरे नगरसेवक अँड उमेश वालदे, नगरसेवक अशोक कंगाली,बोके मॅडम ना. तहसीलदार मानकर सर, कवियत्री संगिता ठलाल
मरसकोल्हे साहेब, उपस्थित होते.
रानभाजी महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी नाहीतर तहसीलदार राजकुमार धनवाते सर्वांग विकास अधिकारी धीरज पाटील सदन शेतकरी गणपत सोनकुसरे नगराध्यक्ष अनिता बोरकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कुरखेडा तालुक्यातील विविध बघत गटातील महिलांनी रान भाज्याचा स्टाल लावून रान भाज्याची महती पटवून दिली.
यावेळी कुषी विभागा मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी संजय रामटेके यांनी केले तर सूत्रसंचालन सपना कन्नाके यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक कृषी पर्यवेक्षक वाय एम बोरकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी बांधव उपस्थित होते.