कूंभीटोला येथे नियम बाह्यपणे घरकूलाचे बांधकाम,
1 min read(संबधितावर कार्यवाही करा अन्यथा आमरण उपोषन राजू मडावी यांचा पत्रकार परिषदेत इशारा)
कूरखेडा, ११ डिसेंबर : तालुक्यातील कूंभीटोला येथे एकाच कूटूंबातील वडील व मूलाला नियमबाह्य पणे मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच घरकूलाचे बांधकाम करताना प्रत्येक्षात दोन घरकूल मिळून एकच बांधकाम केले व सार्वजनिक जागा बळकावत सदर बांधकाम करण्यात आले असा आरोप कूरखेडा येथे आज दि.१० डिसेंबर सोमवार रोजी दूपारी १ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत कूंभीटोला येथील राजू सदरू मडावी यानी केला आहे.
कूंभीटोला येथील निवासी एकाच कूटूंबातील अंताराम कापगते व घनश्याम कापगते या वडील व मूलाला सन २०२३/२४ मध्ये मोदी आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले यावेळी घरकूल बांधकामाकरीता मूद्रांकावर वडीलानी मूलाला आपल्या नावावर असलेली घराची अर्धी जागा लिहून दिली मात्र त्याचा ग्रामपंचायत रिकार्ड मधील नमूना ८ मध्ये दर्शविण्यात आलेली १४०० स्केअर फूट जागेपेक्षा प्रत्येक्षात मौक्यावर जागा कमी आहे त्यामूळे त्याने दोन्ही मंजूर घरकूलाचे एकत्रित बांधकाम करताना घराचा अगदी समोर असलेल्या सार्वजनिक विहीराचा प्लेटफार्म तोडत येथील काही जागा बळकावत नियमबाह्य पणे बांधकाम केले आहे या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत तसेच पंचायत समिति व मूख्यकार्यपालन अधिकारी गडचिरोली यांचाकडे तक्रार केल्यानंतर त्याचा घरकूलाचा पूढील हप्ता थांबवित बांधकाम बंद करण्याचे आदेश त्याला देण्यात आले होते मात्र या आदेशाला न जूमानता त्याने घराचे बांधकाम केले आहे त्यामूळे नियम बाह्य बांधकाम करणार्या घरकूल लाभार्थाना तसेच सार्वजनिक जागा बळकावत सूरू बांधकामाला आळा न घालता त्याला अप्रत्येक्ष प्रोत्साहन देणार्या ग्राम सचिव व सरपंच तसेच वारंवार तक्रार करूनही कार्यवाही संदर्भात थातूर माथूर उत्तरे देत चालढकल करणार्या घरकूल अभियंता यांचा या संदर्भात भूमिकेची निष्पक्ष चौकशी करीत कार्यवाही करण्यात यावी तसेच शाशनाचा निधीचा चूकीचा पध्दतीने खर्च करणार्याविरोधात जबाबदारी निश्चित करीत त्यांचा विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत राजू मडावी यानी केली आहे तसेच ७ दिवसात संबधितावर कार्यवाही न झाल्यास पंचायत समिति कार्यालया समोर आमरण उपोषन आंदोलन सूरू करण्याचा इशारा सूद्धा मडावी यानी पत्रकार परिषदेत दिला आहे.