December 22, 2024

स्व. जे. टी. पाटील म्ह्शाखेत्री यांची १०५ व्या जयंती निमित्य शालेय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन

1 min read

कुरखेडा , १८ डिसेंबर: (प्रतिनिधी) स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आज दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोज गुरुवारला श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली संस्थेचे आद्य संस्थापक तथा माजी अध्यक्ष , माजी आमदार स्व.जे.टी.पाटील म्ह्शाखेत्री यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली .
त्यापीत्यर्थ स्व. जे. टी. पाटील म्ह्शाखेत्री यांच्या प्रतिमेला माल्ल्यार्पण व दिप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली संस्थेचे आद्य संस्थापक तथा माजी अध्यक्ष , माजी आमदार स्व.जे.टी.पाटील म्ह्शाखेत्री यांची १०५ वी जयंती निमित्य शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून “शालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले यात एकूण ३२ विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित प्रतिकृती सादर केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्वर्णदीप उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा चे प्राध्यापक संतोष मेश्राम , विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक उद्धव वाघाडे , जेष्ठ शिक्षिका संघमित्रा कांबळे , प्रकाश मुंगनकर हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अविनाश गौरकार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्व.ज.टे.पाटील म्ह्शाखेत्री यांच्या आठवणींना उजाळा दिला , स्व.ज.टे.पाटील म्ह्शाखेत्री यांनी गडचिरोली या आदिवासी क्षेत्रामध्ये शिक्षण सर्व सामान्य घटकांना मिळावे यासाठी केलेले अथक प्रयत्न व लोकसेवेचा वसा या विषयी सविस्तर वर्णन केले व विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावे असे कथन कथन केले .
कार्यक्रमाचे संचालन लीकेश कोडापे तर आभार प्रदर्शन चंद्रकांत नरुले यांनी मानले . विज्ञान प्रदर्शनीचे संपूर्ण आयोजन तथा नियोजन महेंद्र नवघडे व लीकेश कोडापे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील नोगेश गेडाम , राजेश पराते , भीमराव सोरते , कु.भूमेश्वरी हलामी , कु.दिव्या भानारकर , प्राध्यपक विजय मेश्राम , मनोज सराटे , कालिदास सोरते , गुरुदास शेंडे , रुपेश भोयर , स्वप्नील खेवले , मुनेश्वर राऊत , विवेक गलबले , प्रा.आलाम , प्रा.निकिता दरवडे विद्यालयातील जेष्ठ लिपिक अनिल बांबोळे , लोकेश राऊत , कालिदास मलोडे , शिवा भोयर , घनश्याम भोयर , अक्षय देशमुख तथा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .

About The Author

error: Content is protected !!