शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील जयश्री तिरगम च्या मॉडेलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी करिता निवड
1 min readकुरखेडा ,१० जानेवारी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , प्रादेशिक विद्या प्राधिकरण , नागपूर शिक्षण विभाग ( माध्यमिक ) , जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय , विसोरा ता.देसाईगंज जि.गडचिरोली येथे दिनांक ०७ , ०८ , ०९ जानेवारी २०२४ ला आयोजित करण्यात आली होती .
या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत शिवाजी हायस्कूल कुरखेडा ता.कुरखेडा येथील वर्ग ८ ( अ ) मधील विद्यार्थिनी कु.जयश्री पितांबर तीरगम हिने कार्बन शोषक यंत्र या वैज्ञानिक प्रतीकृतीस शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील सहाय्यक शिक्षक महेंद्र नवघडे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्राथमिक गटात तृतीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झालेली आहे .
कु.जयश्री पितांबर तिरगम व सहा.शिक्षक महेंद्र नवघडे यांना किसान विद्यालय कोरेगाव येथील संस्थापक महेंद्र चचाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णा गजभे प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) वासुदेव भुसे , विनायक शिक्षण संस्था चे सचिव भैयाजी नाकाडे , देसाईगंज पंचायत सामिती चे गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे , गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा , उपसरपंच संजय करांकर , जगदीश शर्मा , मोतीलाल कुकरेजा , देवेंद्र नाकाडे , चेतन नाकाडे हे उपस्थित होते .
तिच्या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली चे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री , सहसचिव गोविंदराव बानबले , शाळा समिती अध्यक्ष तथा संस्थेचे सदस्य अरुण पाटील मुनघाटे , संस्थेचे सदस्य डी.एन.चापले , एन.आर.पाटील म्ह्शाखेत्री बी.सी.पाटील मुनघाटे , शरद पाटील ब्राम्हणवाडे तथा शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार व विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी जयश्री तिरगम हिचे कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेला शुभेछ्या दिल्या .