गेवर्धा येथे अंगणवाडी केंद्राचा भूमिपूजन सोहळा आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते संपन्न
1 min readकुरखेडा, १० जानेवारी : गेवर्धा गावात नवीन अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा सन्माननीय आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
भूमिपूजन सोहळ्यात आमदार मसराम यांनी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालकांना शिक्षण व पोषण आहार मिळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “या अंगणवाडी केंद्राच्या उभारणीमुळे गावातील लहान मुलांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून बालकांचा विकास साधणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.”
या प्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,ग्रामपंचायत सरपंच, सूषमा मडावी ग्राम पंचायत सदस्य रोशन सय्यद,हेमंत सिडाम, आशिष टेंभुर्णे, तंठा मूक्त समीती अध्यक्ष राजू बराई,बबलू शेख,सुनील कीलनाके राजेंद्र कुंभरे.सुधीर बुद्ध
अंगणवाडी सेविका वर्षा बुद्धे मोनिका बुद्धे आणि गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यांनी या नवीन अंगणवाडी केंद्रासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी आमदारांना गावातील इतर विकासकामांबद्दल आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. आमदारांनी त्या मागण्या लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.
या नव्या अंगणवाडी केंद्रामुळे गावातील लहान मुलांच्या विकासाला नवा हातभार मिळेल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.