बनपुरकर महाविद्यालय व पोलीस मदत केंद्र मालेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपन
1 min readमालेवाडा, १० जानेवारी: अँड. विठ्ठलराव बनपुरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथे पोलीस मदत केंद्र मालेवाडा व राष्ट्रीय सेवा योजना विभागा च्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील पीएसआय मा.श्री. भीम मोरे यांच्या नेतृत्वामध्ये व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हरिश्चंद्र कामडी यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस मदत केंद्र मालेवाडा येथील श्री. सानप मेजर, श्री शहारे मेजर, श्री मडावी मेजर, श्री. हिचामी , श्री. काबंळे, श्री. चोपकर, श्री साधन मेश्राम, श्री कालिदास मडकाम, श्री. आरिफ शेख, श्री. प्रविन वालदे, श्री. पटले इ कर्मचारी
त्याप्रमाणे महाविद्यालयातील राश्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप नंदेश्वर, डॉ. हिवराज राउत, डॉ. प्रकाश वैद्य, डॉ पल्लवी काळे, डॉ. वर्षा ठाकरे, श्री. दिपक बनपुरकर, प्रा. रामटेके, प्रा. कन्नाके, प्रा. कुमरे, प्रा.नरुटे, प्रा. सहारे, प्रा. आश्टेकर, श्री. अविनास, श्री. राहूल तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.