जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत दिव्यांग गटातून विकास विद्यालय, कुरखेडा प्रथम!
1 min readकुरखेडा, १० जानेवारी : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपुर व शिक्षक विभाग ( माध्य.) जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.७ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ ला ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी विनायक माध्य. तथा उच्च माध्य. विद्यालय विसोरा ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आली होती. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांनी तब्बल ९८ प्रतिकृती सादर करून सहभाग नोंदवीला होता. यामध्ये विकास विद्यालय कुरखेडा येथील आदर्श बरमदास विनायक याने प्राथमिक (दिव्यांग) गटात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांला श्री. वासुदेव भुसे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हापरीषद गडचिरोली यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. या करीता विज्ञान शिक्षिका कु. सायली हेमंत मस्के यांनी अथक परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्रज्ञा शिल करुणा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. मान. पी .आर. आकरे साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याधापक श्री. आर. एम. अलगदेवे सर तथा शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.