बौध्दगया महाविहार बौद्धांचा ताब्यात द्या; बौद्ध बांधवांचा कूरखेडा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला

कूरखेडा, ५ मार्च : बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाविहार ही बौद्धांची मालमत्ता आहे ती बौध्दांचा ताब्यात देण्यात यावी या मागणी करीता बौद्ध भिक्खू संघ मागील एक महिण्यापासून बौद्धगया येथे उपोषण आंदोलन करीत आहे मात्र या आंदोलनाकडे शाशनाचे दूर्लक्ष आहे सदर मागणीची गांभीर्य समजून घेत तातडीने कायद्यात दूरूस्ती करावी व महाविहार बौद्धांचा ताब्यात देण्यात यावा या मागणी करीता आज दि.५ मार्च बूधवार रोजी दूपारी १ वाजता डॉ आंबेडकर चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर समता सैनिक दल व बौद्ध समाज मंडळ कूरखेडा यांचा वतीने घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतिना निवेदन पाठविण्यात आले.
याप्रसंगी बौद्ध समाज मंडळाचे हिरा वालदे, जितेंद्र वालदे, रोहित ढवळे, संजय रामटेके, रमेश नंदेश्वर, नितेश खोबरागड़े, विनोद खोबरागड़े, प्रमोद खोबरागड़े, प्रमोद सरदारे,सूरेश कराडे ताराचंद नंदेश्वर,शिला डोंगरे, अभिमन्यु बंसोड, प्रल्हाद लाडे, पूरषोत्तम भैसारे,समर्थ सहारे,मुक्ताजी दूर्गे, रमेश ढवळे, प्रियंका टेंभूर्णे,विश्वबोधी कराडे,लताबाई सहारे,बनवारी बागडे, हेमराज मेश्राम,सूनिल सहारे, ओमप्रकाश सहारे, रूपेश सहारे,राजू सहारे, धनपाल बागडे,नानाजी वालदे,महाविर धोंडणे तसेच समता सैनिक दल व बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते.