कमी दाबाचा विद्यूत पूरवठ्याने त्रस्त शेतकर्यांची विजवितरण कार्यालयावर धडक

कूरखेडा, ५ मार्च : कूरखेडा,आंधळी,चिचटोला, चिखली,नान्ही व परीसरातील कृषी पंपाना अत्यंत कमी दाबाचा विद्यूत पूरवठा होतअसल्याने पंप निकामी ठरत रब्बी पीकाला पाणी पूरवठा करने शेतकर्याना अडचणीचे होत आहे त्यामूळे त्रस्त शेतकर्यानी विजवितरण कंपनीचा उपविभागीय कार्यालयावर धडक देत उपविभागीय अभियंता मूरकूटे यांचाशी चर्चा केली व तातडीने दूरूस्तीकार्यवाही करीत शेतकर्याना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला.
परीसरात शेतकर्यानी रब्बी हंगामात धान व मका पीकाची लागवट केली आहे पीकाना यावेळी पाण्याची गरज असते मात्रया परीसरात अत्यंत कमी दाबाचा विद्यूत पूरवठा होत असल्याने पंप निकामी ठरत आहे व पंपाद्वारे पाण्याची निकासी शक्य होत नाहीआहे त्यामूळे शेतकरी त्रस्त झाले आहे तसेच दिवसातील २४ तासापैकी १२ तास विज पूरवठ्याचा आदेश असतानाही कृषी पंपाना १२तास विज मिळत नाही व १ ते २ तास विज खंडीत असते ही अडचण तातडीने दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेचतालूक्याकरीता १३२ के वी क्षमतेचा विद्यूत सब स्टेशन मंजूर आहे मात्र अद्यापही सदर सब स्टेशनचे बांधकाम सूरू करण्यात नआल्याने विद्यूत संदर्भात अनेक अडचणीचा नागरीकाना सामना नागरीकाना करावा लागत आहे तातडीने सदर बांधकाम सूरूकरण्याची मागणी यावेळी करण्यात आली व निवेदन देण्यात आली याप्रसंगी शेतकरी बांधव हजर होते.