व्हॉइस ऑफ मीडियाच्या कुरखेडा तालुका अध्यक्ष पदी विजय भैसारे, सचिव विजय नाकाडे, कार्याध्यक्ष पदी विनोद नागपुरकर

कुरखेडा , ७ मार्च : गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या सुचनेवरून, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी यांच्याउपस्थितीत व्हॉईस ऑफ मिडीया कुरखेडा तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात व्हॉईस ऑफ मिडीया तालुकाअध्यक्षपदावर विजय भैसारे यांची तर सचिवपदी विजय नाकाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण गडचिरोलीजिल्ह्यातील १२ हि तालुक्याची नव्याने कार्यकारिणी बनविण्याचे काम सुरू आहे.
अध्यक्षपदी विजय भैसारे व सचिव पदी विजय नाकाडे यांची निवड होताच लगेच अध्यक्ष, सचिवांनी आपली सहकारी टिमचीकार्यकारिणी सुद्धा त्याच बैठकीत गठीत केली. यात तालुका कार्याध्यक्षपदावर विनोद नागपूरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष शिवा भोयर , कार्यवाहक महेंद्र लाडे , प्रसिद्धी प्रमुख सिराज पठाण तर या सर्वांचे मार्गदर्शक व जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमेश बोरकर व ताहीर शेख यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून श्याम लांजेवर , शालिकराम जनबंधू , राम लांजेवार , चेतन गहाणे , आदींची निवड करण्यात आली. यावेळी बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हा कार्याध्यक्ष नासिर हाशमी व सर्व पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, व संघटनेच्या पुढीलवाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. तर पत्रकारांच्या समस्या व येणाऱ्या अडचणी तसेच खासकरून पत्रकार भवना करीता प्रयत्नकरणार असल्याची ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष/सचिवांनी दिली.