October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कुरखेडा-देसाईगंज मार्गावर डरकाळ्या फोडत रस्त्यावरून फिरणाऱ्या वाघिणीची दहशत

कुरखेडा , ११ मार्च : कुरखेडा ते देसाईगंज मार्गावरील गेवर्धा वनक्षेत्रात सध्या एका नवतरुण वाघिणीने दहशत निर्माण केली आहे. आपल्या आईपासून वेगळी होऊन स्वत:चे कार्यक्षेत्र निश्चित करत असलेली ही नवतरुण वाघिण अवघी दिड वर्षाची आहे. विशेषम्हणजे ती बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरून मुक्तसंचार करताना, रस्ता ओलांडताना दिसल्याने या मार्गावरून जाणाऱ्यानागरिकांसह गेवर्धा परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

कुरखेडा ते देसाईगंज मार्गावर मुक्तसंचार करणाऱ्या वाघिणीचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. त्यातील तिच्याडरकाळ्यांनी धडकी भरल्याशिवाय राहात नाही. एका चारचाकी वाहनधारकाने तो प्रसंग कॅमेरात कैद केला. वाहनाच्या हेडलाईटच्याप्रकाशात ती वाघिण स्पष्टपणे दिसते.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत वाघिणीसह तिचे बछडेही सोबत होते. पण आता बछडे मोठे झाल्यानंतर ते आईपासून वेगळे होऊन आपलेस्वतंत्र अस्तित्व शोधत आहेत. आपले कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी ते वेगवेगळ्या भागातील जंगलात फिरत आहेत. त्यामुळे त्याभागात प्राण्यांच्या शिकारी वाढण्याची शक्यता आहे. प्रसंगी मनुष्यहाणीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या ज्याभागात या वाघांचे अस्तित्व आहे त्या भागातील नागरिकांनी जंगलात किंवा जंगलाशेजारील शेतात जाताना योग्य खबरदारी घेणेगरजेचे असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!