April 25, 2025

अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यां पुढे नागरिकांनी सादर केले पुरावे

अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी न लावता सुरू असलेल्या नाली बांधकामाला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे, १२ मीटर मंजूर रस्ता मोकळा केल्याशिवाय नाली बांधकाम करू देणार नाही असा पवित्रा लोकांनी घेतला आहे”

कुरखेडा, ११ मार्च : येथील गांधी वार्ड, प्रभाग क्रमांक ९ मधे पेट्रोल पंप लागत सुरू असलेल्या नाली बांधकाम व अतिक्रमण धारकांना अभय देत १२ मीटर रस्ता मोकळा न केल्याने आक्रोशीत येथील नागरिकांनी आता चक्क अतिक्रमण सिद्ध करणारे पुरावेच नगरपंचायत प्रशासनाला सादर केले आहे.

नागमोडी नाली बांधकाम वरून संतापलेल्या नागरिकांनी निवेदन सादर करून नाली बांधकाम थांबविण्याची विनंती प्रशासनास केली होती परंतु नाली बांधकाम सुरूच असल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी १० मार्च रोजी  मुख्याधिकारी पंकज गावंडे यांचे कक्ष गाठत येथील अतिक्रमण बाबत संपूर्ण दस्तऐवज पुरावे सादर केले आहे. निवेदन सादर करताना झालेल्या औपचारिक चर्चेत मुख्याधिकारी यांनी आधी नाली बांधकाम होवुद्या अतिक्रमणाचा नंतर बघू असे बोलल्याने आक्रमक झालेल्या नागरिकांनी २०१८ मधे ही याच प्रकारे अतिक्रमण न काढता सुरू असलेल्या नाली बांधकामासाठी लिखित निवेदन दिले होते. तेव्हा ही असंच वेळकाढूपणा तत्कालीन पदाधिकारी व प्रशासनाने घेतला होता. अतिक्रमण न काढता ती नाली आजही तसीच अर्धवट बांधकाम करून सोडलेली आहे. आता या प्रकरणात ही नगरपंचायत प्रशासन टाळाटाळ व वेळकाढूपणा करत असल्याचं आरोप लोकांनी केला.

१२ मीटर सर्व्हिस रोडवर बांधली दुकान चाळ?

दरम्यान पुराव्यासह सदर केलेल्या निवेदनात नागरिकांनी या ठिकाणी उभी असलेल्या दुकान चाळ बाबत ही आक्षेप नोंदवला आहे. नागमोडी नाली बांधकाम करून ज्या दुकानचाळीला वाचविण्याचा प्रयत्न नागपंचायत प्रशासन करत आहे, ती दुकान चाळच अवैधपणे बांधकाम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. याबाबत नागरिकांनी नकाशे व अकृषक आदेशांची प्रतच मुख्याधिकाऱ्यांना सादर केली आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी निर्गमित केलेल्या निवासी आकृषिक आदेश क्रमांक  Revenue Case No. 02. NAP-34 / 2000-2001 Mauza- Kurkheda ORDER Passed this 9th day of March 2001 कावि/उविअ/प्र/२९७/२००९ दिनांक: ६..२००९ ची पायमल्ली करत १२ मीटर सर्व्हिस रोड वर अतिक्रमण करून चक्क शॉपिंग काम्प्लेक्स उभारण्यात आलेला आहे. सदर दुकानचाळ पूर्णतः अनधिकृत असून अकृषक आदेश मिळविताना शासनास निहित केलेल्या सदर जागा अनधिकृत रित्या बळकावण्यात असलेली आहे.

शासनाची दिशाभूल करून अकृषक परवानगी मिळाल्या नंतर सर्व्हिस रोड असलेल्या जागेवर अतिक्रमण करून  अनधिकृत बांधकाम केले आहे. निवासी अकृषक परवाना मिळविताना नियमाप्रमाणे १२ मीटर सर्व्हिस रोड असल्याचा यात नमूद आहे. ऐवढे पुरावे व प्रत्यक्ष डोळ्याने दिसणारे अतिक्रम वाचविण्यासाठी नगरपंचायत प्रशासन कोणत्या स्वार्थासाठी अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करत आहे हे समजणे पलीकडे आहे. सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी रास्त मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

सदर निवेदन सदर करताना डॉ. भैयालाल राऊत, वामन कोटंगले, बी. के. किरंगे, रमेश वाघमारे, एस. बी. वालदे, प्रशांत उंदिरवाडे, विनायक देशमुख, डॉ. मनोज मार्गिया, बालकृष्ण ठाकरे, डॉ. मयूर नाकाडे आदी प्रभाग क्रमांक ९ चे रहिवासी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!