April 25, 2025

शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने कुरखेडा तालुका शिवसेना पक्ष संघटन मजबूत

कुरखेडा, १९ मार्च :  आगामी स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्ष्यात घेता गडचिरोली जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. अशातच कुरखेडा येथील शेकडो सक्रिय युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेतेआदरणीय ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी योजना, मुख्यमंग्त्री माझी लाडकीबहीण, लखपती दीदी, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ यासारख्या जनतेसाठी कल्याणकारी योजना आणल्याने, तसेच शिवसेनाविदर्भ नेते विकासाचे महामेरू किरणजी पांडव साहेब यांच्यावर विस्वास ठेवून तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे यांच्या नेतृवात शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील शिवसेनेची पकड मजबूत झालेली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख संदीपजी बरडे (पाटील) यांचे शुभहस्ते शेकडोयुवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी राकेशभाऊ बेलसरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष, दिपकभाऊ भारसागडे युवासेना जिल्हाअध्यक्ष, नारायणजी धकाते साहेब आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक , राकेश भाऊ बैस आरमोरी विधानसभासमन्वयक,अनिकेतभाऊ आकरे तालुका अध्यक्ष कुरखेडा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

तसेच अनिकेतभाऊ आकरे यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्यांपैकी ईश्वर ठाकूर तालुका संघटक, मुकेश माकडे तालुका प्रसिद्धी प्रमुख, शहेजाद हाश्मी तालुका वैद्यकीय प्रमुख, दीपक धारगाये युवासेना तालुका प्रमुख, चेतन मैंद युवासेना शहर अध्यक्ष यांची संदीपजीबरडे (पाटील) राकेशभाऊ बेलसरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!