“कोतवाल / महसूल सहायकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू, तहसील कार्यालय समोर बसले उपोषणाला”

कुरखेडा , २० मार्च : महसूल सेवक (कोतवाल) यांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता संघटनेची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून कुरखेडा येथील शाखेच्या वतीने आज पासून तालुक्यातील सर्व कोतवाल काम बंद करून तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
विदर्भ तथा कुरखेडा तालुका अध्यक्ष रविंद्र बोदेले यांच्या नेतृत्वात आज सुरू झालेल्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनात उपाध्यक्ष दामु नाकाडे सह जितेंद्र अंबादे , गेंदराव मारगाये , प्रल्हाद हलामी , अविनाश कोडाप , अशोक उईके , तुलाराम हलामी , अक्षयकिरंगे , पवन मडकाम , गिरीधर कोडाप, अविनाश तुलावी , लवेश कुमरे, निकेश पुळो , प्रशांत मडावी, मनोज तुलावी , फिरोजहलामी , ममता ढवळे , नलु शेन्डे , अनुज्ञा लाकडे , गायत्री फापणवाडे , भाग्यश्री मडावी, ममता पुराम , काजल उईके , जी पीकुमरे, आ . ए नैताम, वाय पडमल , सुनिल तुलावी, अनिल सयाम, मनोज गावळे , संगिता पुराम , संजय कुमरे , एस होळी , गौरवनाहारमुते , मयुर उईके , खुशाल उसेंडी , राजेंद्र तुलावी , मीनाश्री पुराम आदी तालुक्यातील महसूल सहायक सहभागी झाले आहेत.
शासन जोपर्यंत मागण्या मान्य करीत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. महसुली सहायकांच्या या आंदोलनामुळे तालुक्यातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अनेक तलाठी आहे पूर्ण वेळ तलाठी नसल्याने या ठिकाणी महसुली सहायक प्रभावीपणे काम करतात. अश्यातच या आंदोलनामुळे प्रभारी तलाठ्यांनाही मोठी अडचण होणार आहे.