“डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उघडले उज्वल भविष्याचे नवे द्वार”

कुरखेडा, २४ मार्च : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत तालुक्यातील वडेगाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हायस्कूल येथे डिजिटलशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा वेगवान व उल्लेखनीय विकास होत आहे. डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उज्वलभविष्याचे नवे द्वार उघडले असून त्यांची प्रगतीकडे आगेकूच सुरू झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 37 शाळांमध्ये विद्यार्थी संगणक साक्षर होत आहेत. डिजिटल इंडिया च्यास्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे व आधुनिक काळात स्पर्धेत टिकायचेअसेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल. संगणक हाताळणे शिकावे लागेल. हे उद्देश समोर ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षणपरिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांनी आयसीटी (ICT)हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीजिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर हायस्कूल वडेगाव या शाळेत देखील आयसीटी शिक्षण प्रभावीपणे राबवलेजात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्षणीय परिणाम होत आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्हा प्रकल्प समन्वयकश्री अविनाश सयाम यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या ठिकाणी संगणक शिक्षिका कुमारी रक्षा नरेंद्रसिंह बैसयांची नियुक्ती झाली असून या लॅबच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते. आयसीटी (ICT)विषयाच्या शिक्षिका कुमारीरक्षा बैस यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल शिकवून यामुळे त्यांचा अभ्यास अधिकआकर्षक आणि उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमात येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असे मत शाळेचेमुख्याध्यापक माननीय विजय कुमार लोथे तसेच शिक्षक वृंद कुमार साहेब सहारे यांनी व्यक्त केले.