April 25, 2025

“जागतिक क्षयरोग दिनानिमीत्य प्राथमीक आरोग्य पथक चारभट्टी येथे जनजागृती व क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न”

96 रुग्नाची एक्सरे  तसेच विवीध रक्त तपासण्या करण्यात आल्या”

कुरखेडा, २४ मार्च : महाराष्ट्र शासन द्वारे राबविण्यात येते असलेल्या 100 दिवस क्षयरोग मोहीमेअंतर्गत जनजागृती जागतिकक्षयरोग दिन साजरा करण्यात आला.

तालु‌का आरोग्य अधिकारी कार्यालय कुरखेडा, प्राथमीक आरोग्य केंन्द्र पूराडा प्राथमीक आरोग्य पथक चारभट्टी यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद ठिकरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मेधा चव्हारे यांच्या मार्गदर्शना खाली चारभट्टी येथे क्षयरोग तपासणी आयोजित करण्यात आला होता. या शिबीरात अतिदुर्गमआदिवासी बहुल नक्षलग्रस्त चारभट्टी येथे 96 रुग्नाचे एक्सरे इतर सर्व प्रकारच्या आवश्यक रक्ततपासण्या सूद्धा करण्यातआल्या.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन सरपंचा प्रिती ताई मडावी हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच पितांबर बह्याळ  प्रमूख अतिथी म्हणून डॉ. चंद्रकांत नाकाडे वैद्यकीय अधिकारी प्रा.. पथक चारभट्टी, डॉ. विवेक आकरे वै.. पलसगड, डॉ. अश्वीनी कवासे समूदाय आरोग्य अधिकारी, राहुल बडोले STS , श्री. तुपट, MPW-कुष्टरोग, कु. नंदिनी मेश्राम, प्रयोग शाळातंत्रज्ञ, कु. प्रियका रघूत, कु. जयश्री मस्के इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटक सरपंचा सौ. प्रितीताई भडावी यांनी उपस्थितांना संबोधित करतांना आरोग्य विभागाकडून  जनजागृती उत्कृष्ट सेवा दिल्यामूळे ग्रामीण भागातील आदिवासी जनता तपासनिकरीना स्वतःहून सामोरे यायला लागत आहे. तसेच ग्रामीणजनता शासनाच्या विवीध योजनांचा सूद्धा लाभ घेत आहेत. अश्याप्रकारे आरोग्य विभाग शासनाचे प्रती कौतूकास्पद उद्‌गार काढले आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अतिथी म्हणून डॉ. चंद्रकात नाकाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात क्षय रोगाची कारणे , लक्षणे , निदान उपचार पद्धतीयाविषयी उपस्थीत सर्व जनतेला सविस्तर माहीती दिली. आठते पंधरा दिवसापर्यंत खोकला येत असेल भूक लागत नसेल, वजनकमी होत असेल, खूप दिवसापासून अंगात ताप असेल असे लक्षणे असत्यास त्वरीत आपल्या जवळच्या उपकेन्द्र, आरोग्य केन्द्र, उपजिल्हा रुग्नालय  मध्ये जाऊन क्षयरोग तपासणी करावी. कारण अशी लक्षणे क्षयरोगाची राहू शकतात. प्रा. आः केन्द्र पूराडा उपजिल्हा रुग्नालय कुरखेडा मार्फत क्षयरोग्याच्या निदानासाठी होणाऱ्या सर्व तपासण्या या मोफत केल्या जात आहेत.

तसेच क्षय रुग्नांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे दुर्धर आजाराच्या मदतीसाठी प्रति महीना १००० रूपये प्रमाणे सहा महिन्याचे६०००/ रुपये या रुग्नाच्या खात्यात जमा केले जातात. या पैशाला पोषक आहारासाठी वापर करावा असे आवाहन डॉ. चंद्रकांत नाकाडे यांनीकेले. क्षय रुग्णांनी सार्वजनीक ठिकाणी थुंकू नयेत, तसेच नियमीत मास्कचा वापर करावा पोषक आहार नियमीत घ्यावा, शरीरास आवश्यक तसे योग व्यायाम करावा असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये ग्रामीण नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील ९६ रुग्णांचे मोफत एक्सरे काढण्यात आले. इतर रक्ताच्या तपासण्या सुद्धा मोफत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विवेक आकरेडॉ. अश्वीनी कवासे यांनी केले. तर आभार श्री राहूल बडोलेSTS, यानी मानले. कार्यक्रमाच्या सफलते करीत कु. प्रियका रघूते, कु. जयश्री मस्के, श्शरद गजभिये, एस जिलेला प्रा. . पथक चारभट्टी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!