October 22, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या अर्जदारांसाठी आज विशेष कृती कार्यक्रम; कागदपत्रांसह उपस्थित राहा

गडचिरोली, २७ मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “100 दिवसांचे लक्ष्य” या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या दैनंदिन जीवनातीलअडचणी दूर करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण आणि सरळीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीजिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या अर्जदारांसाठी विशेष कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

शैक्षणिक, सेवाभरती, निवडणूक व इतर प्रयोजनांसाठी सन 2024-25 मध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जदाखल केलेल्या व अद्याप वैधता प्रमाणपत्र न मिळालेल्या अर्जदारांनी, पूर्वी कळविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठीआवश्यक कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित राहायचे आहे. यासाठी समिती कार्यालयात “विशेष त्रुटी पूर्तता मोहीम कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. त्रुटींची पूर्तता केलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून निर्णय घेण्यात येत आहे.

मात्र अनेक प्रकरणे अजूनही त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. अशा सर्व अर्जदारांसाठी आज, दिनांक 27 मार्च रोजी “विशेष कृती कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी अर्जाची पावती, जात दावा सिद्ध करणारी सर्व महसुली व शालेय मूळ व छायांकितकागदपत्रे घेऊन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीयआय.टी.आय.चौक, एलआयसी रोड, गडचिरोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचेउपायुक्त देवसुदन धारगावे यांनी केले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!