खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी ऑनलाइन गेमिंग बाबत संसदेत व्यक्त केली चिंता

गडचिरोली, २७ : विज्ञानाने आधुनिक तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे, त्यामुळे फायद्या सोबतच मोठे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतआहेत. ऑनलाईन गेमींग हा त्यातीलच एक प्रकार, यामुळे मुलांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे, अशी चिंता व्यक्त करत खासदारडॉ. नामदेव किरसान यांनी सरकार काही उपाय करणार आहे की नाही, असा प्रश्न केला. त्यावर माहिती व प्रसारण तसेचइलेक्ट्रॉनक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला.
लोकसभेत २६ मार्चरोजी खासदार डॉ. किरसान यांनी ऑनलाईन गेमिंग मुळे लहान मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा पाढाचवाचून दाखविला. मुले जेवत नाहीत, अभ्यासाकडे लक्ष नाही, असे डॉ. किरसान म्हणाले. ऑनलाईन गेम्समुळे अनेक प्रौढ देखीलनिराशेच्या गर्तेत सापडलेले असून आर्थिक नुकसानीतून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरदेताना सांगितले की, यासंदर्भात सरकार अतिशय गंभीर असून १४१० साईटस् बंद केल्या आहेत. यासंदर्भातील अहवाल मागविलेअसून आवश्यकतेनुसार योग्य ती कारवाई केली जाणार आहे.