घामाच्या मोबदल्यासाठी “रोहयो” मजुरांच्या बँकेत चकरा; 7 महिने होऊनही ” कामाची मजुरी मिळेना !

कुरखेडा , २७ मार्च : शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत कुरखेडा तालुक्यातील कढोली परिसरात स्थानिक प्रशासनाच्यावतीनेविविध कामे करण्यात आली. मात्र सात महिन्यांचा कालावधी लोटूनही मजुरांच्या खात्यात कामाचा मोबदला जमा न झाल्यानेहातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांची आर्थिक कोंडी होत आहे. आज ना उद्या खात्यात कामाची रक्कम मिळेल, या आशेनेरोहयो मजूर बँकेत चकरा असल्याचे चित्र आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गाव पातळीवरील विकास कामांना गती येते. यायोजनेच्या माध्यमातून जॉब कार्डधारक मजुरांना किमान शंभर दिवस काम देण्याची हमी दिली जाते. यांतर्गत गावातील मजूर वर्गालागावातच रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. मात्र कढोरी परिसरात केवळ 25 ते 35 दिवसांचे काम मिळत आहे. या कामाचामोबदला म्हणून दिवसाकाठी 293 मजुरी दिली जाते. याअंतर्गत कढोली परिसरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने तलाव खोलीकरण, मजगीसह इतर कामे करण्यात आली. मात्र तब्बल सात महिन्यांचा कालावधी लोटूनही केलेल्या कामाची मजुरी अजूनपर्यंत मिळालीनसल्याने मजूर वर्गात तीव्र रोष निर्माण झाला आहे. आज ना उद्या खात्यात कामाची रक्कम जमा होईल, या आशेने मजूर बँकेच्याचकरा मारीत आहेत. ग्रामीण भागात रोहयोअंतर्गत मोठ्या प्रमाणात अकुशल कामे केली जातात. मजूरवर्ग कुटुंबासह ऊन्हातान्हातघाम गाळूनही वेळेवर कामाची मजुरी उपलब्ध होत नाही. मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला कधी मिळणार? याकडे मजुरांचे लक्षलागले आहे. गोरगरिबांची मजुरी देण्याबाबत शासन उदासीन असल्याचे दिसते, असे म्हटल्यास वावगे ठरु नये.