कुरखेडा येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचा बहुमान

कुरखेडा, २८ मार्च : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा : सुंदरशाळा टप्पा – २ अभियानानातील खाजगी गटात जिल्हास्तरावर कुरखेडा तालुक्यातील श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा ने व्दितीय क्रमांक पटकावले आहे. ५ लाखरुपयांचे पारितोषिक असलेल्या या स्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण पार पडले. तालुक्यातील सर्वात जुनी शैक्षणिक सुविधा असलेली व परिसरात नावलौकिक मिळवलेल्या या शाळेने आपली गुणवत्ता कायम राखत मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा – २ मध्ये बाजी मारली आहे .

मुख्यमंत्री माझी शाळा : सुंदर शाळा टप्पा – २ या अभियाना अंतर्गत भौतिक सुविधा , शैक्षणिक गुणवत्ता , अध्ययन , अध्यापन , प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , पर्यावरण संवर्धनाची जाणीव , सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता , चांगले आरोग्य , राष्ट्रीय एकात्मतेची भावना , वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न , व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख , अंगभूत कला – क्रीडागुणांचा अशाअनेक निकषांचा अंतर्भाव करण्यात आला होता . हे सर्व निकष पूर्ण करीत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा याशाळेने यश संपादन केले व जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांकाचे ५ लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविला .
विद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता कायम राखीत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळेचा यशस्वी प्रवास सुरु आहे. तो कायम राखण्याचा निर्धार शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा चे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांनी व्यक्त केला आहे .
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा मुख्यमंत्री माझी शाळा : सुंदर शाळा टप्पा – २ मध्ये जिल्हा स्तरावर व्दितीयक्रमांक पटकाविल्याबद्द श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली अध्यक्ष अनिल पाटील म्ह्शाखेत्री , सहसचिव गोविंदरावबानबले , सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष अरुण पाटील मुनघाटे , सदस्य डी.एन.पाटील चापले , सदस्य शरद पाटील ब्राम्हणवाडे, एन.आर.पाटील म्ह्शाखेत्री , बी.सी.पाटील मुनघाटे व कुरखेडा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी प्रविन्द्र शिवणकर, कुरखेड्याचे केंद्रप्रमुख संजय मेश्राम यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा : सुंदर शाळा टप्पा – २ तील अभियानातजिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक पटकाविला त्या बद्दल जिल्हा परिषद , गडचिरोली येथील वीर बाबुराव शेडमाके या सभागृहातदिनांक २७ मार्च २०२५ ला मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) वासुदेव भुसे , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) बाबासाहेब पवार , उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे , डायट चे अधिव्याख्याता पुनीत मातकर यांच्या हस्ते विद्यालयाच्या वतीने उपस्थित असलेले श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली चे सहसचिव गोविंदराव बानबले , सदस्य शरद पाटील ब्राम्हणवाडे , कुरखेडा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी प्रवीण शिवणकर , कुरखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख संजय मेश्राम , विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार , सहा.शिक्षक लीकेशकोडापे , रुपेश भोयर यांना सन्मान चिन्ह देऊन शाळेला गौरविण्यात आले .