April 25, 2025

25 जानेवारी 2023 ला राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

गडचिरोली,(जिमाका) दि.23: दिनांक 25 जानेवारी हा भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस असुन यावर्षी 25 जानेवारी 2023 ला 13 वा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आलेले असून शाळा/ महाविद्यालय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा मध्ये गुणनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हास्तरावर आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसाचे कार्यक्रमात करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हास्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता करण्यात येणार आहे.
13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting ; I vote for sure ” हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आलेला असून भारत निवडणूक आयोग राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमामध्ये “मै भारत हु ” हे गीत लॉन्च करणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांना मतदानाबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे

About The Author

You may have missed

error: Content is protected !!