बचत गटाच्या नावाखाली खाजगी बेकायदेशीर अवैध सावकारी करणाऱ्या 2 सावकारांचे घरावर सहकार विभागाची धाड
1 min readआक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई
गडचिरोली,(जिएनएन)दि.04: गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या 2 महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्या धाड टाकली. यात नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराचे कागदपत्रे आढळून आली. ती कागदपत्रे जप्त करुन त्यांच्या विरुध्द सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे सहकार विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकारांचे निबंधक गडचिरोली प्रशांत धोटे यांचे आदेशान्वये शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने, दिनांक 20/01/2023 रोजी तक्रारदार यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सौ. मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर या महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाल्याने विक्रमादित्य पितांबर सहारे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी सौ. मोनिका किशोर खनके यांचे घरी व पंकज नारायण घोडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,ता.चामोर्शी यांनी श्रीमती संगीता निबांळकर यांचे घरी एकाच वेळी धाड सत्र राबविण्यात आली. या शोध मोहीमेत सौ.मोनिका किशोर खनके यांचे घरी 12 स्टॅम्प पेपर,12 स्टॅम्प पेपरच्या छायांकित प्रती 7 कोरे धनादेश 1 धनादेश बुक, 2 साध्या पेपरवर केलेला करारनामा, रकमेच्या नोंदी असलेल्या 21 चिठ्ठया, 3 रजीस्टरची पाने, व 10 हिशोबाच्या नोंदवहया, 06 ब्ँक पासबुक, अनेक व्यक्तीच्या नावाने असलेल्या /मतदानकार्ड/ पॅनकार्ड /आधारकार्डांच्या इलेक्ट्रिक बीलांच्या 24 छायांकित प्रती ,विक्री पत्र, मालमत्तापत्र (सेलडिड) तसेच तर आनुषांगीक 39 कागदपत्रे इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.
तसेच सौ.संगीता निबांळकर यांचे घरी 6 स्टॅम्प पेपर , 02 डायऱ्या 12 कोरे धनादेश 3 सात/ बारा नमुने, 5 सेलडिड नमुने 21 चिठ्ठया, 6, विक्रीपत्र, 5 मालमत्तापत्र (सेलडिड) इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.
सदर कागदपत्रांची चौकशीनंतर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे सहाय्यक निबंधक विक्रमादित्य सहारे यांनी सांगीतले.
ही कारवाई गडचिरोलीचे जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे, यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली विक्रमादित्य सहारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली व पंकज नारायण घोडे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका चामोर्शी यांचे पथकाने सकाळी 8.33 मिनिटींनी धाड घातली यात त्यांना सुशिल वानखेडे, सहकार अधिकारी श्रेणी-1, कुरखेडा, डि.आर.बनसोड, कार्यलय अधिक्षक, .विजय पाटील, लोमेश रंधये, सचिन बंदेलवार, अनिल उपासे, वैभव निवाणे, हेमंत जाधव शैलेंद्र खांडरे, ऋषीश्वर बोरकर, शालीकराम सोरते, शांताराम कन्नमवार, अशोक शेळके, उमाकांत मेश्राम, शैलेश वैद्य, तुषार सोनुले, प्रकाश राऊत यांनी तर महिला कर्मचारी सौ.स्मिता उईके, कु.शोभा गाढवे, सौ.अनिता हुकरे, श्रीमती धारा कोवे, श्रीमती कविता बांबोळे यांनी धाड यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
या कारवाईसाठी पंच म्हणुन रमेश कोलते, गट सचिव विविध कार्यकारी सहकारी संस्था, गडचिरोली व घनश्याम भुसारी आदिवासी विविध कार्यकारी संस्था,मर्या.खरपुंडी यांनी कामकाज केले.
पोलीसविभागातर्फे श्री.निलोत्पल जिल्हा पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. दिपक कुंभारे, यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस शिपाई सतिश कत्तीवार, दिपक लेनगुरे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके महिला पोलीस शिपाई शेवंता दाजगाये, श्रीमती पुष्पा कन्नाके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी सहकार्य केले.
बेकायदेशीर तक्रारीचे अनुषंगाने काही तक्रार असल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरेाली तसेच तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात तक्रारदारांनी पुढे येवुन तक्रार दाखल करावी असे आवाहन प्रशांत धोटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,गडचिरोली यांनी केले आहे.